मी स्वतः देव नाही कारण माझ्यात अहंकार आहे. I am not "GOD" because I have an "EGO"
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8ozj4gQZDzVQxpffme6wdbSdvkP0X8TL3j48JS8sgVR81QJ2jTvUy9WTOMQePO_nbYxuL5p8ieZnVjhbzM3IkO2eH5HScTtg75OqOSq8XFdREzQPOs0CU3Yfl2dKcrzCznEYdCq53Q78D/s640/download.jpeg)
अहंकार हा प्रत्येक माणसात असतोच असतो. तो कितीही सोडतो म्हटल तरी सोडता येतच नाही... अहंकार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो...तो प्रत्येकात असलाही पाहिजे पण तो किती प्रमाणात असावा, किती धरून ठेवावा...कधी आणि किती प्रमाणात सोडून द्यावा हे प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक,आर्थिक आणि कौटुम्बिक परिस्थितिवर अवलंबून असत. "स्व"....अहंकार बलपणात पण आपले सोबत असतो पण तो मोठ्या व्यक्तिमध्ये जसा उग्र स्वरुपात काम करत असतो.. तसा उग्र तो बलपनात झालेला नसतो.... कारण बलपनीच्या गरजा कमी...म्हणून अहंकार पण थोडा कमीच असतो... अहंकारा शिवाय जीवन असूच शकत नाही...अहंकार कधी सोडून द्यावा कधी धरून ठेवाव याचे सारासार भान ज्या ज्या व्यक्तिकडे असते तो जीवनात यशस्वी होतोच. अहंकाराचा हा खेळ सदैव सावली सारखा आपल्या सोबत असतो...माझे तर असे ठाम मत आहे बालपना पासून मरणा पर्यन्त अहंकार हा आपले सोबतच असतो...अहंकारा शिवाय जो जगतो तो फक्त "देवच" असु शकतो आणि आपण सामान्य माणसे "देव" बरे कसे होऊ शकणार...आपल्या सारख्या सामान्य माणसाला सामाजिक आर्थिक आणि कौटुम्बिक जीवन सम्भाळायचे असते...त्य...