शेतकऱ्यांच्या आत्महते मागील खरे कारण
सरकारनी शेतकऱ्याला कितीही मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली तरी शेतकरी आहे तसाच राहतो....? तो नियमित पणे आत्महत्या का बरे करतो....? यावर उपाय मिळणे फार कठिण का असावे...? समजा शेतकऱ्याला सरकारने हमी भाव वाढवून दिला, शेतमालाला लीलावात मोठी बोली पण लावून दिली, शेतात पाणी आणण्यासाठी मोटर दिली, खत खरेदिसाठी पैसे दिलेत, ठिबक सिंचनासाठी पाइप लाइन दिली तरी पण त्याचा काहीच फायदा होतांना का दिसत नाही....? कारण शेतीसाठी लागनाऱ्या इतर गोष्टी जसे की-
महाग झालेली मजुरी, बी बियाने, अवजारे, खते, पेस्टिसाइड आणि शेतीसाठी लागणारे इतर साहित्य शेतकऱ्याला जो पर्यन्त कमी दरात मिळणार नाही तोपर्यन्त भरतातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच राहणार....!!
जो पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेला भ्रष्टाचार, कायदा असून सुद्धा हमी भावा पेक्षा कमी दराने शेतमालाची व्यापाऱ्या द्वारा केली जाणारी खरेदी, ऍग्रो कम्पण्याचे चढे दरातील उत्पादने , सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार या सर्वांची शेतकऱ्यांचे विरोधात मिळून आलेली साखळी तुटणार नाही तो पर्यंत शेतकरी आर्थिक परिस्थितीने खचलेलाच राहणार....कुणीतरी शेतकऱ्यावर कुरघोडी सतत करत राहणार....जोपर्यंत शेतकऱ्यांची सगळी सब्सिडी शेतीसाठी लागणारीे महागड़ी मजूरी, मुलांच्या शिक्षणाच्या महाग झालेल्या फीस,
तथा बी बियाने, अवजारे, पेस्टिसाइड, चढ्या दराने माल खरेदी करण्यातच संपुन जाईल....महागड्या दरातील शेतिविषयक खरेदीमुळे , महागड्या मजुरीमुळे आणि पिकवलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळू न देनाऱ्या व्यापाऱ्यांच्या साखळी मुले शेतकऱ्याला सब्सिडिचा फायदा मिळून सुद्धा न मिळाल्यासरखेच होणार... सरकारला शेतकऱ्यांच्या जीवनातले हे आत्महत्या
सत्र आणि शोषण पर्व संपुन नवे जीवनदायी क्रांतिपर्व अस्तित्वात आनण्यासाठी नव नवीन कायदे किंवा आयोग नेमन्यापूर्वी शेतकऱ्याला शेतीसाठी मिळणाऱ्या वस्तू रास्त दरात मिळतायेत की नाही..मशागत आणि पिक काढणीसाठी मजूर सुध्दा रास्त दरात मिळतायेत की नाही हे पण बघावेच लागेल .... शिवाय शेतकऱ्याला त्याचे मुला मूलीनां शिक्षण घेण्यासाठी खुप पैसे तर द्यावे लागत तर नाहीना याचा सुद्धा विचार करावा लागेल...म्हणूनच तर म्हणतोय सरकारने कितीही सब्सिडी देऊ देत...जो पर्यन्त शेतकऱ्याच्या साध्या सध्या प्राथमिक गरजा ह्या रास्त दरात पूर्ण होणार नाहीत उदा.शेतीविषयक अवजारे,पेस्टिसाइड, खते, सुसह्य मजुरीदर, शेतातील पिकाला योग्य भाव आणि इतर लागणाऱ्या वस्तु शेतकऱ्यास रास्त दराने मिळणार नाहीत....तो पर्यन्त भारतातील शेतकारी वर्ग श्रीमंत होणार नाही आणि त्यांच्या आत्महत्या पण थांबणार नाहीत.....!!!!! सरकार, ऍग्रो कम्पन्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी एकत्र येऊन शेतकऱ्याला त्याचे जगणे सुसह्य कसे करता यासाठी काम करणार नाहीत...
आणि शेतमालाला योग्य भाव मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत..... तोपर्यंत शेकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती होणार नाही....!
Comments
Post a Comment