मी स्वतः देव नाही कारण माझ्यात अहंकार आहे. I am not "GOD" because I have an "EGO"
अहंकार हा प्रत्येक माणसात असतोच असतो. तो कितीही सोडतो म्हटल तरी सोडता येतच नाही... अहंकार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो...तो प्रत्येकात असलाही पाहिजे पण तो किती प्रमाणात असावा,
किती धरून ठेवावा...कधी आणि किती प्रमाणात सोडून द्यावा हे प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक,आर्थिक आणि कौटुम्बिक परिस्थितिवर अवलंबून असत. "स्व"....अहंकार बलपणात पण आपले सोबत असतो पण तो मोठ्या व्यक्तिमध्ये जसा उग्र स्वरुपात काम करत असतो.. तसा उग्र तो बलपनात झालेला नसतो.... कारण बलपनीच्या गरजा कमी...म्हणून अहंकार पण थोडा कमीच असतो...
अहंकारा शिवाय जीवन असूच शकत नाही...अहंकार कधी सोडून द्यावा कधी धरून ठेवाव याचे सारासार भान ज्या ज्या व्यक्तिकडे असते तो जीवनात यशस्वी होतोच. अहंकाराचा हा खेळ सदैव सावली सारखा आपल्या सोबत असतो...माझे तर असे ठाम मत आहे बालपना पासून मरणा पर्यन्त अहंकार
हा आपले सोबतच असतो...अहंकारा शिवाय जो जगतो तो फक्त "देवच" असु शकतो आणि आपण सामान्य माणसे
"देव" बरे कसे होऊ शकणार...आपल्या सारख्या सामान्य माणसाला सामाजिक आर्थिक आणि कौटुम्बिक जीवन सम्भाळायचे असते...त्यासाठी आपण आपले अहंकारासोबत अनेक वेळा तडजोडी केल्यात म्हणूनच आपण आणि आपले कुटुंबिय समाजात चांगले व्यक्ति म्हणून विकसित होऊ शकलो... समजा आपण आपले जीवनात आपले अहंकारा सोबत तडजोडी केल्या नसत्यातर आपले जीवन दुःखदायक राहिले असते नाही का....?
माणसा मधला अहंकार जेव्हा खुप वाढू लागतो तेव्हा तेव्हा खरे तर माणसाने स्वचिन्तन करून स्वतःचे विकासातिल अडथळा दूर केला पाहिजे पण तसे करण्यासाठी माणसाला फार कष्ट पडतात मन सहजा सहजी तयार होत नाही...मनाला भरपूर वेदना होतात...अर्थात स्वताच्या ईगो "ego" दुखावतो आणि ज्या ज्या व्यक्ति यावर मात करतात ते सर्व जीवनात यशस्वी होतात असे समाजात दिसून येते...आता बघा तुम्हीच ठरवा स्वतःचा
"ego"
कुठपर्यंत सम्भाळायचा.....!!!!!!
बघा विचार करा खाली दिलेले वाक्य बरोबर आहे की नाही ते.... आणि तुम्हीच ठरवा त्याचे उत्तर मिळते का ते....!!!"ego"
कुठपर्यंत सम्भाळायचा.....!!!!!!
The more " i " observe, " i " find that " i " am blocking myself, and others are not blocking me. What is blocking us from doing any good or bad things...is that our mind, which is somehow cultured but it is fully polluted from personal "ego".....!!!!!
Comments
Post a Comment