UNAFFORDALE MODERN MEDICATION


माझा रुग्ण जो की पॅरालिसिस झालेला रुग्ण बरा न होण्याचे अवस्थेला पोहचलेला.....रुग्णाच्या मोठया मुलाला साधारण 30 हजार रुपये महिन्याला पगार याच मोठ्या मुलांनी वडीलाला चांगल्यात चांगल्या हॉस्पिटल मध्ये भरती करून 15 दिवसापूर्वीच 8 लाख खर्च केलेत...एवढ्यात रुग्णाचा छोटा मुलगा मोठ्या भावाकडे वडिलांना भेटायला आलेला..
तर मोठ्या भावाला लहान भाऊ म्हणतोय तू वडिलांना बघतच नाही...तुला फक्त पैसा हवाय...दोन्ही भावाचं दवाखान्यातच भांडण लागल...मी लहान भावला म्हटल... अरे आसे भांडू नका... 8 दिसपूर्वीच मोठया भावानी वडीलासाठी 8 लाख खर्च केलेत...तर लहान भाऊ म्हणतोय तो खोट बोलतो...लहान भाऊ म्हणत होता डॉक्टर तुम्ही चांगले हॉस्पिटल सांगा मी वडिलांना तिथे भरती करतोय...रुग्ण चांगल्या हॉस्पिटल मध्ये भरती झालाय...लहान भावानी वडीलासाठी परत 7 लाख खर्च केलेत...पण 2 दिवसा पासून लहान भाऊ हॉस्पिटल मध्ये जाताच नाही अस मोठ्या भावाकडून कळल हॉस्पिटल च बिल पण 25000 थकलय...अस मोठा भाऊ दवाखान्यात येऊन सांगतोय...आता मी काय करू असे मोठा भाऊ विचारतोय...वैद्य म्हणून अश्या नातेवाईकांना काय सल्ला द्यावा.....
1.पुढील उपचार अजुन एखादे चांगले हॉस्पिटल मध्ये सुरु ठेवा....?
2.पैसे कमी पड़त असतील तर रुग्णाला रुग्णालयातून घरी परत आणा.....?
3.रोग बरा होणारा नसल्यामुळे मोठ्या हॉस्पिटल मध्ये न ठेवता घरिच छोटे मोठे उपचार करा.....?
4.भारतात महागडया कारपोरेट रुग्नलयाच जाळ पसरलय त्यात रुग्णाला भरती करून घ्या...?
5. .................?
6. संदर्भ : https://youtu.be/7ot8_oZDmQY
7.  महागड्या झालेल्या आणि उपचारात कॉम्प्लेक्सिटी     वाढलेल्या आधुनिक उपचार पद्धतीने
एवढ्या सगळ्या गावो गावीच्या आणि शहरातील रुग्णांना कार्पोरेट रुग्णालयात जिथे डेंगू चे उपचारासाठी 16 लाख रुपयांचे बिल होते तिथे उपचार द्या...?
8.एवढया सगळ्या रुग्णांना भावना प्रधान होऊन 15 - 15 मिनिटांनी शुगर आणि 15-15 मिनीटांनी ब्लड प्रेशर तपासले पाहिजे की.... ऊन पावसा मध्ये  झाडे जगतात तसे थोडे नैसर्गिक जीवन जगू दिले पाहिजे..?
9. सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा एखाद कार्पोरेट रूग्णालयातील सामाजिक भान असलेला कार्पोरेट हॉस्पिटलचा ओनर किंवा कार्पोरेट डॉक्टर कदाचित तुमच्या मदतीला येईल ...?


आणि भारतातल्या सर्वसाधारण उत्पन्न असलेल्या गरीब आणि मध्यम स्वरूपाचे उत्पन्न असलेल्या घराघरातील रुग्णाचे आयुष्य थोड सोप करण्यास मदत करेल ...?
की......
11. अनैसर्गिक पद्धतीने महाग होत असलेली किंवा क्वालिटी मेडिकल केअरचे नावाखाली अति महाग होत जाणारी रुग्ण सेवा सर्वसामान्य रुग्णासाठी "मृगजळच" ठरेल .....?

संदर्भ :

https://milaap.org/stories/support-shreyshi-mandal



जेव्हा पासून मेडिक्लेम कम्पण्या मार्केट मध्ये आल्यात तेव्हा पासून ट्रीटमेंट कॉस्ट वाढत आहे हे मात्र खर आहे....अश्या या वाढणाऱ्या ट्रिटमेंट कॉस्ट ची कारणे काय असावीत यासाठी बरेच लिहता येईल पण एवढे मात्र निश्चित यापुढील काळात मेडिक्लेम कँपन्यांच भांडवल कार्पोरेट हॉस्पिटल उघडण्यासाठी वापरले जाणार हे मात्र निश्चित....अर्थात मेडिक्लेम कँपन्यांचे डायरेक्टरांची गुंतवणूक हॉस्पिटल सारख्या व्यवसायात वाढवली जाऊन... याच मेडिक्लेम कँपन्यांचे डायरेक्टरांची संपूर्ण वैद्यकीय व्यवसायावर येणाऱ्या काळात पकड मजबूत होईल हे मात्र निश्चित...काही काळानंतर मेडिक्लेम कँपन्यांचे डायरेक्टर हॉस्पीटल ओनरना वेगवेगळ्या केसेस मध्ये अडकविण्याची शक्यता वाढीस लागून.....डॉक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्यात आनंद वाटणार नाही अशी भयावह स्थिती निर्माण होईल....या परिस्थिस कोण जबाबदार असेल हे आताच सांगणे कठीण....पण काळ मात्र यावर उत्तरे शोधून ठेवेल....पण त्यासाठी अजून काही काळ यासाठी द्यावा लागेल....शिवाय मेडिक्लेम कम्पण्या एवढाले 10 -20 लाखाचे साधे साधे आजारांचे कार्पोरेट हॉस्पिटल मधील बिले कशी आणि का मंजूर करतात हे सुद्धा तपासून बघणे गरजेच वाटते....कधी कधी तर अस वाटतय आरोग्य व्यवस्थेवर डॉक्टरांचे संघटनांचे आणि इंडियन मेडिकल कौन्सिल चे वर्चस्व राहिलेले नसून फक्त क्रोनी कॅपिलिस्ट लोकांचे हातात 360° चे कंट्रोल गेलेले असावे अशी भयावह परिस्थिती आरोग्य क्षत्राची दिसून येते.... सरकारनी सुद्धा मेडिकल कौन्सिल चे अधिकार कमी करून त्यांचेवर नॅशनल मेडिकल कमिशन ची स्थापना केलीय हे कशाचे द्योतक असावे.....की.... क्रोनी कॅपिटालिस्ट लोकांना सरकार द्वारा मदत करण्याचा प्रकार समजावा अशी द्विधा परिस्थिती आपल्या देशातील आरोग्य क्षेत्राची झालीय.......!!!!!!

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..