विचारांचा भोवरा

 *विचारांचा भोवरा फिरला कसा गरागरा*


2005 ते 2025 या काळात तंत्रज्ञानामुळे झालेला बदल अचंभित करणारा होता..माणसाच्या मनावर ताबा घेतलेला हाच तो काळ.. सहज आणि सतत मिळणारे अगणित ज्ञान, सततचे दृष्यप्रदुषण, वेळेचा अपव्यय, सारासार विचार करण्याची हरवत गेलेली क्षमता, दुसऱ्यांच्या विचारा पुढे स्वतःतल्या विचारातली कमतरता, वाढत गेलेला विसरभोळेपणा, अती आत्मकेंद्रित वृत्ती हे सगळे आपल्यात कधी शिरले कळलेच नाही..कारण तंत्रज्ञानाचा स्पिडच एवढा जबरदस्त होता की विचार करून तंत्रज्ञान समजून घेण्यातच 15 ते 20 वर्ष कधी गेलीत हे आपल्या मनाला कळलेच नाही..

त्यातल्या त्यात जिवशास्त्रातले बदल तर डॉक्टरांसाठी आणि त्यांच्या रुग्णासाठी अती अचंभित करणारेच होते..डॉक्टर त्यांच्याजवळच्या तोकड्या ज्ञानाच्या आधाराने कसे निरुपयोगी उपचार करायचे हे सगळ्या जगाला कळल ते याच काळात..नाही का..!!

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..