अकाली वृद्धत्व

 *अकाली वृद्धत्व*


आपल्या मेंदूचे काम सुरळीत आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी खालील मुद्यावर विचार मंथन करा..


1.विसरभोळे पणा वाढला का..


2.कामाचा आणि मोबाईलचा (दोन्ही गोष्टींचा) व्याप जास्त अशी परिस्थिती झाली का..


3.घरातल्या किंवा ऑफिसातल्या वस्तू कुठे ठेवल्यात ते आठवत नाही का..


4.काम करण्यात मन लागत नाही का..


5.छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखे सारखे मोबाईल हातात घ्यावा लागतो का..


6.बौध्दीक, भावनिक, सामाजिक आर्थिक गरजा अपूर्ण राहिल्यात असे सतत वाटते का..


7.कितीही कष्ट केले तरी गरजा पूर्ण करू शकेल की नाही ही भावना मनात निर्माण होत आहे का..


8.ऑडी किंवा मर्सिडिज चे हप्ते भरणे जड जाईल असे वाटते का..


9.मुलांच्या शाळेच्या वाढत्या फिस ची चिंता लागलीय का..


10.स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबाचे आणि म्हाताऱ्या होत जाणाऱ्या आई वडिलांचे आरोग्याचे प्रश्न मनात दडा धरून बसलेत का..


11.बीन कामाच्या कामात स्वतःला व्यस्त ठेऊन महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष्य होत आहे असे वाटते का..


असे असेल तर समजून जायचे भविष्यात *डीमेंटीया*(अकाली वृद्धत्व) नावाच्या आजाराने तुम्ही ग्रस्त होणार आहात..


*थोडक्यात काय तर "अनेक प्रश्न" आहेत पण त्याची उत्तरे मिळत नाहीत अशी अवस्था झालीय का..*


अश्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरे *"होय"* अशी येत असतील तर समजायचे तुम्हाला अकाली वृद्धत्व येणार.. तुम्हाला अती कामामुळे आणि ताणामुळे *डीमेंटीया* नावाचा मेंदूचा आजार होणार..


*यावरचा उपाय*


अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर..कामाचे परफेक्ट नियोजन करायला शिका..

मेंदूवर जास्त तान येणार नाही याची काळजी घ्या..कमी वेळात चुका न करता आणि मेंदूवर तान न येता जास्त कामे कशी करता येतील त्यावर लक्ष्य द्या..

त्यामुळे अकाली वृद्धत्व काही काळासाठी लांबवता येते..पण *वयाच्या सत्तरी नंतर अकाली वृद्धत्व हे टाळता येणे अशक्य असते* हे ही ध्यानात ठेवा..ज्यांची ज्यांची साठी झालीय त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून आपले अकाली वृद्धत्व 8 ते 10 वर्षांनी कसे कमी करता येईल यावर सतत मनन करत रहा आणि त्यावरचे संशोधन सुरूच ठेवा..बर का..!!

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..