लाईफ मॅनेजेंटम
जीवनात त्रस्त आहात..
जीवनात हवे तसे काही घडत नाही..उत्पन्न कमी त्यामुळे मन प्रसन्न राहत नाही..
कुटुंबाच्या वाढत्या गरजा पूर्ण करतांना मानसिक त्रास होतोय..बिझिनेस मध्ये हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही..
पगार कमी गरजा जास्त..
अशी परिस्थिती झालीय का..
चार चाकाची गाडी घ्यावीशी वाटते..यू ट्यूब मध्ये दिसते तसे सुंदर इंटेरियर केलेले घर घ्यावेसे वाटते..परंतु कमी उत्पन्ना मुळे ते घेणे शक्य वाटत नाही..साधारण उत्पन्नामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाही..*अशी द्विधा परिस्थिती तुमच्या मनाची झाली असेल तर आत्महत्या करणे हा त्यावरचा मार्ग असू शकत नाही..* आत्महत्या करणे ऐवजी तुम्ही उत्पन्न कसे वाढेल यावर भर द्यावा..
*वेळेचे आणि आर्थिक परिस्थितीचे मॅनेजेंट करायला शिका..* ती आजच्या काळातील आवश्यक गरज झालेली आहे..*कमी उत्पन्नातही चांगले जीवन कसे जगता येईल यावर भर द्या..* एखादी हॉबी डेव्हलप करून त्यात स्वतःला बिझी ठेवायला शिका..लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेच पाहिजे असे नसते..*स्वतः पुढेच अनेक प्रश्न उपस्थित असताना समाजातील इतर प्रश्नावर उपाय शोधणे म्हणजे मानसिक आजाराच निमंत्रणच..* तुम्हाला स्वतःला जीवनात अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतोय त्यावर *महागडी उत्तरे* शोधायचा प्रयत्न करू नका..*कमी खर्चात सुध्दा सुंदर पद्धतीने प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते शोधत रहा..* जीवन सुंदर आहे..हे कळण्यासाठी त्यातील *प्रश्नाचा झालेला गुंता सोप्या पद्धतीने कमी वेळात, कमी खर्चात सोप्या मार्गाने कसा सोडवता येईल त्यावर भर द्या..*
थोडक्यात काय तर *जीवनाचे मॅनेजेंटम उत्कृष्ट पद्धतीने करायला शिका..*
आत्महत्येचा विचार तुमच्या मनात कधीच येणार नाही.. *तुम्ही सुंदर आहात, तुमचे जीवन सुदंर आहे..ते सुंदरच राहणार आहे..हेच तर यातून तुम्हाला शिकायचे आहे..तर मग तुम्ही ते शिकणार ना.."हो हो शिकणारच.." आम्हाला आमचे जीवन सुदंर बनवायचेच आहे..आणि आम्ही ते बनवणारच.*
https://youtube.com/shorts/EDkoEfz85P0?si=rHmgnwokyAMisusO
https://youtube.com/shorts/234WAHdlB9I?si=hZ0JfV9Gktk92ZQT
Comments
Post a Comment