ऍडजस्टमेंट डिसऑर्डर , डिप्रेशन ते डीजनरेशन
माणूस अती पसाऱ्यामुळे घरात, अती कामामुळे ऑफिसात किंवा सतत च्या प्रवासामुळे जेव्हा विचार करून थकतो आणि जीवनातल्या अनेक अडचणींचा सामना करतांना विचार करून त्याला जीवशासस्त्रातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत..
अश्यावेळी मग माणूस विचार करून करून फार थकुन जातो..
तरीही परंतु त्याला जीवनातल्या अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तेव्हा मग तो मनुष्य पूर्णतः मनाने, विचाराने, शरीराने आणि मेंदूने थकतो..अश्यावेळी
सर्वप्रथम तो ऍडजस्टमेंट डिसऑर्डर ने ग्रस्थ होतो..त्यानंतर त्याला ब्लड प्रेशर चा आजार होतो..त्याच रुग्णाला मग डायबेटिस सारखा बरा न होणारा आजार पण होतो..या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एन्झायटी न्यूरोसिस या आजाराची लक्षणे माणसास सर्वप्रथम दिसू लागतात..अश्या अनेक शारीरिक आणि मानसिक कारणामुळे माणसाच्या मेंदूला मग आपल्याच शरीरातले हार्मोन व्यवस्थित नियंत्रित करता येत नाहीत..या सगळ्याचा शरीरावरील परिणाम म्हणजे माणूस डिप्रेशन मध्ये जातो..
डिप्रेशन ची लक्षणे उग्र आहेत, मध्यम स्वरूपाची आहेत की तीव्र स्वरूपाची आहेत हे उपचार देणाऱ्या मानसोपचारातल्या तज्ञ डॉक्टर लाच कळू शकते..की त्याचे कडे आलेला रुग्ण किती दुःखी आहे..बरे पुढील काही दिवसात त्याच्याकडे आलेल्या रुग्णाला..स्मृतीभ्रंश, अल्झायमर सारखे आजार किती लवकर प्रमाणत पकडतील याचा अंदाज येतो.. दिसत असलेल्या लक्षणा प्रमाणे मग त्या रुग्णाला औषधोपचार सुरू केले की रुग्णाला थोडे बरे वाटते..पण वाढत्या वयामुळे आणि वाढत्या प्रॉब्लेम्स मुळे औषधोपचार करूनही रुग्णाला अनेक वेळा आराम मिळत नाही..तेव्हा समजायच रुग्णाचे वय बहुतेक 65, 75 ते 80 च्या दरम्यान आहे..उपचारामुळे रुग्णात आणि त्याचा लक्षणात आराम पडण्याऐवजी आजार बळावत असेल तर समजायचे..रुग्णाच्या मेंदूतील पेशीमध्ये डिजनरेशन च्या प्रक्रियेने जोर धरलेला आहे..
आजाराच आणि रुग्णाचे आता काही खर नाही..समजून जायच रुग्ण हा क्रॉनिक स्वरूपाच्या व्याधींनी ग्रस्त झालेला आहे..
उपचार करून जास्त फायदा होणार नाही..हे समजून येते..
समाजातील आर्थिक प्रॉब्लेम, सामाजिक प्रॉब्लेम, आणि मोबाईलच्या अती वापरामुळे ही सगळी लक्षणे..वयाच्या 75 तरीच्या ऐवजी वय वर्षे 25, 40 किंवा 50 वयाच्या माणसात आढळून यायला लागतात तेव्हाच तर खरा सामाजिक प्रॉब्लेम सुरू झालेला असतो..नाही का..!!
Comments
Post a Comment