अंशतः लोकशाही
*अंशतः लोकशाही*
*ब्रेक द लॉ आणि मेक द लॉ*
प्रश्न : अंशतः लोकशाही म्हणजे काय..?
उत्तर : निवडणुकांचा वापर करायचा असतो तो फक्त सत्ता मिळवण्यापूरता आणि ती एकदा मिळाली की सत्तेचा वापर करायचा असतो *हुकूमशहा* सारखा..
*खायला काही नसेल तर काय करायच नुसत विचारांच स्वातंत्र्य..* आणि हो हेही लक्ष्यात घ्या लोकशाही मुल्याला तेव्हाच किंमत असते जेव्हा खायला आणि विचारला देशात स्वातंत्र्य असते.. भारत दिसतो खरा लोकशाही मूल्यांना जपणारा देश..पण देशातील राज्यकर्ते आणि त्यांचे सरकारी बाबू महत्व देतात ते लोकशाहीच्या अंशतः मूल्यांना.. लोकशाहीत सगळेच राज्यकर्ते किंवा सगळेच नेते चांगले निपजतील आणि जनतेच सगळ काही चांगल होईल असे अजिबातच नसते बर का.. जी व्यवस्था चांगल्याची हमी देऊ शकत नसेल पण भ्रश्टाचारी आणि वाईट गोष्टींना रोखू शकत नसेल अश्या व्यवस्थेला अंशतः लोकशाही म्हणतात हे समजून घ्या.. देशातली प्रत्येक जात आम्ही मागासलेले आहोत आम्हाला मागासवर्गीय म्हणून आरक्षण द्या अशी मागणी जेव्हा करू लागतात.. तेव्हा त्याला देशाचा विकास झाला असे म्हणताच येत नाही.. जेव्हा सर्व सामान्यांना आरक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी सरकार कडे हात पसरावा लागणार नाही.. तोच खरा दिवस असेल आपण विकसित झाल्याचा.. *सामान्य जनतेचा सेल्फ डिफेन्स हा कायद्याच्या राज्यात जेव्हा काढून घेतल्या जातो किंवा निष्प्रभ केल्या जातो.. तेव्हा कायद्याचे राज्य आपल्या देशात आहे हे म्हणणे थोडे हास्यास्पदच वाटते नाही का..* सरकारी बाबू, राज्यकर्ते आणि कॉर्पोरेट यांच्या संगनमताने सरकारी कामे आणि सरकारी टेंडर काढून घेण्यासाठी..
*ब्रेक द लॉ आणि मेक द लॉ*
चा सरकारी ऑफिस मधला खेळ सर्वसामान्य जेव्हा उघड्या डोळ्यांनी रोज बघत असतात..तेव्हा अश्या व्यवस्थेलाच म्हणतात *अंशतः लोकशाही..*!!
Comments
Post a Comment