अस्पिरेशनल भारत..डिजिटल भारत
*कोल्याबरेटीव्ह*
*अस्पिरेशनल भारत*
*डिजिटल भारत*
बेरोजगारी, कौशल्याचा अभाव, गरिबी आणि संधीचा अभाव या दुष्टचक्रात अडकलेला आजचा ग्रेट इंडियन मिडल क्लास साठी..
*शिक्षण हेच आजचे मूल्य तेच आपले सामर्थ्य आणि तेच जर आपले दुःख बनत असेल* तर पुढे काय..? बेरोजगारीत भारताचे जगात 86 वे स्थान..
त्याच बेरोजगारांची उग्र आंदोलने..नोकऱ्यांसाठीची असह्य धडपड ही न बघवणारी..
यामुळे होते काय माणसातली अस्वस्थता आणि आतताईपणा वाढीस लागतो..अस्वस्थतेचे एकवेळ समजू शकतो..पण त्या अस्वस्थते बरोबर सरकारी भ्रष्टाचाराच्या आतताईपणाचे वर्चस्व समाजात असेल तर मग हिंसाचार वाढतो..भारतातले बेरोजगार, कौशल्याचा अभाव, गरिबी आणि संधीचा अभाव या दुष्टचक्रात अडकलेला आजचा ग्रेट इंडियन मिडल क्लासला मग न्याय मिळवण्यासाठी सरकार दरबारी चकरा मारत राहतो..पण तेथे न्याया ऐवजी अन्यायाचा सामना करावा लागतो..त्यांचे भविष्यच अंधकारमय होते..या अश्या बेरोजगाराने पीडित समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर धोरणकरत्यांनी, राज्यकर्त्यांनी सरकार मधील भ्रष्टाचार समजून घेऊन त्यावर उपाय योजना केल्या तरच समाजात देशातील गोर गरीब आणि मध्यमवर्गीय समाजाला न्याय मिळेल..अन्यथा नाही..!
Comments
Post a Comment