UPROAR.. मानसिक कोलाहल
वाचकाच्या मनातील कोलाहलीचा शोध...
ज्ञानाचा वाढलेल्या अगणित सीमा, दोन पिढ्या मधील ज्ञानात होत जाणारे बदल, त्यात निर्माण होणारी दरी दिवसेंदिवस जटिल होत आहे.. तंत्रज्ञानातील बदल, राजकीय सामाजिक उलथापालथी यांचा आपल्या जगण्यावर झालेला परिणाम. त्यातून निर्माण झालेली दरी आणि त्यामुळे आपल्या सामाजिक विचारावर आणि नातेसंबंधावर झालेला परिणाम म्हणजे आपले आताचे वास्तव. वडीलधाऱ्या माणसांना नवीन पिढींना समजावून सांगता येणारी गोष्ट म्हणजे कुटुंब व्यवस्था आणि त्यावरील प्रेम. पण पुढच्या येणाऱ्या पिढीला तेच नकोय अशी सद्य परिस्थिती. आम्हाला मार्गदर्शन नको आम्हीच तुम्हाला मार्गदर्शन करू अश्या नवीन पिढीची निर्मिती. अस का घडाव याची कारणे तपासली असता असे दिसून येते तंत्रज्ञानाच्या अती उपलब्धतेमुळे आणि त्याच्या अतीवापरामुळे सहज मिळालेले ज्ञान त्यास कारणीभूत आहे. पण या ज्ञानाच्या विस्फोटा मुळे समाजात निर्माण झालेले दोष म्हणजे "विचारांची घुसळण आणि मतमतांचा गदारोळ." मागच्या पिढीकडून पुढील पिढीला मार्गदर्शन कसे करावे यात निर्माण झालेली दरी म्हणजे आजचे वास्तव..प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची या गोंधळात अडकले आपले आजचे जीवन म्हणजे आपल्या "जीवनाचा आजचा कोलाहल"... नाही का..!
Comments
Post a Comment