देव दगडाचाच का...?



२७ लाख वर्षांपूर्वी पाषाण युगात
मानवांनी सर्वप्रथम "दगडा" पासून "शस्त्र" बनवली तीच दगडापासून बनवलेली शस्त्रे


मग मानवासाठी "देव" बनून देवसारखी कामे करू लागली..."पाषाण युगाचे" (स्टोन एज) चे काळात माणसाचे आयुष्य याच दगडाच्या शस्त्रामुळे जरा सुखकर झाल...


विचार तर करून बघा "पाषाण युगाच्या "   (स्टोन एज) २७ लाख वर्षा पूर्वीच्या त्या पुरातन काळात शस्त्राशिवाय आपले  पूर्वज कसे जगले असतील... पुुर्वजांचे दगडा शिवायचे आयुष्य किती कष्टदायक असेल...
जंगली श्वापदांचा सततचा धोका मनुष्यास सारखा त्रास देत असावा...


जीवन मरणाचे प्रसंग तर नेहमीचेच...पण याच काळात 


माणसाने  दगडा पासून शस्त्रे बनवण्याची कला जेव्हा अवगत केली...तेव्हा पासूनच मानसाला "दगडात लपलेला कर्म नावाचा देव" दिसला...दगडात सुद्धा कर्म लपलेल असत याचा शोध मानवास लागला....
दगडाच्या आत असलेले अस्त्र आणि शस्त्रा शिवायचे जगणे हे नरकापेक्षाही वाईट आहे...हे जेव्हा माणसाला स्पष्ट पणे समजले तेव्हा पासून मानवाने
"दगडाची पूजा"


सुरू केली ती आजपर्यंत सुरूच आहे...आता दगडाचे ऐवजी धातूची, प्लास्टिकची आणि सॉफ्टवेअरनि कंट्रोल होणारी अस्त्रे आणि शस्त्रे आलीत त्याचीच आजकाल पूजा होतेय....हाच काय तो फरक ... !!!!
शस्त्र, अस्त्र किंवा मशीन शिवाय जगण्याची कल्पना सुद्धा आज आपण करू शकत नाही... शस्त्र, अस्त्र किंवा आधुनिक मशीन हीच ती आता आपली कायमची दैवते....नाही का....!!!!!





Ref : https://youtu.be/xgd5Mt25koI

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..