शोध विठ्ठलाचा...!!!
शोध स्वतःचा आणि विठ्ठलाचा
विठ्ठलाच्या नुसत्या दर्शनाने
गोर गरीब, शिक्षित,
अशिक्षित,
श्रीमंत
"आनंदी" होताना दिसायचे....
त्यामुळे नेहमी अस वाटायच
खरेच देव असावा...... तोच आपले आणि
सर्व प्राणिमात्रांचे रक्षण करीत असावा....
पण मध्येच काहीतरी
वेगळच दृश्य दिसायच...
कितीतरी
हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये
धाऊन येत नसावा....
गरिबी जगातून का नाहीशी
करत नसावा....
"देव" श्रेष्ठ की "माणुस" श्रेष्ठ याचा विचार सतत डोक्यात असायचा... विचार करून करून डोक दुखायचे....
असाच विचार करत करत लहानाचा मोठा झालो....
पण देव आहे की नाही...आहेतर तर तो कसा असावा...
या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नसे....
कितीतरी वेळा वाटायच देवच श्रेष्ठ आहे.....
कारण पण त्यासाठी तसेच महत्वाचे असायचे
मला जे दृश्य दिसायचे....ते म्हणजे
वारीमध्ये लाखो लोक अनवाणी पायाने चालत,विठ्ठलाच्या नुसत्या दर्शनाने
गोर गरीब, शिक्षित,
अशिक्षित,
श्रीमंत
"आनंदी" होताना दिसायचे....
त्यामुळे नेहमी अस वाटायच
खरेच देव असावा...... तोच आपले आणि
सर्व प्राणिमात्रांचे रक्षण करीत असावा....
पण मध्येच काहीतरी
वेगळच दृश्य दिसायच...
ऍपल सारख्या नावाजलेल्या जागतिक कम्पनीच
हे ब्रीद वाक्य
"थिंक डिफरन्ट"
मग वाटायच आपल काहीतरी चुकत असाव....
एक तर देव असावा
किंवा
देव न मानणाऱ्या ज्या अनेक व्यक्ती
आहेत त्या तरी खरे बोलत असाव्यात....
पण यातून खरे उत्तर मिळत नव्हते....
स्वतःचा आणि देवाचा पण शोध लागत नव्हता.....
विचार तर सतत सुरू असायचे,
प्रश्नाचे उत्तर मिळत तर नव्हतेच....
पण कितीतरी वेळेस गुगलवर बघितलेली अनेक
दृश्य डोळ्यासमोरून जायचे...
एक दिवस गुगल वर दिसलेल हे चित्र
स्वतःविषयी आणि देवाचे शोधा बाबत काहीतरी वेगळा विचार करावा लागेल असच सांगत होत.....मग कधीतरी विचार करताना अशी वेगवेगळी चित्रे डोळ्यासमोर यायची....
वेगळ्या पद्धतीने विचार कर....
विचाराची दिशा बदल.....
डोक्याचा व्यवस्थित वापर कर.....
असे सतत सुचवायची तेव्हाच तुला
देवा बाबत किंवा माणसा बाबत काहीतरी बोध होईल असा भास व्हायचा ...पण स्वताविषयीचे आणि देवबाबतचे भ्रम काही सम्पायाचे
नाहीत काहीतरी वेगळी वाट धरून उत्तर शोधले पाहिजे अस मन नेहमी सुचवायच.... पण ते काहिकेल्या जमून येत नव्हते.....एक दिवस सहज विचार आला आपल कुठतरी काहीतरी चुकतेय करोडो लोक देवाला मानतात देव जगात नक्कीच असावा....
तेच खर असाव
पण समाजातील काही
गरिबांची
ही अशी आणिकितीतरी
हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये
नजरेसमोरून जातच नव्हती.......
अशी ही विदारक दृश्ये बघितल्यार वाटायच
देव नक्कीच नाही
जेवढा जास्त विचार करावा तेवढी जास्त विरोधाभासी
चित्रे नजरेस येत होती....तेव्हा डोक्यात असा सुद्धा
विचार यायचा या अश्या श्रीमंतांचे देव
का वाईट करत नसावा.....
अशी कितीतरी शेकडो विरोधाभासी दृश्ये नजरे समोरून जातच नव्हती...
वाटायच देव श्रीमंतांनाच का मदत करतो....
गरिबांचे मदतीला का बरेधाऊन येत नसावा....
गरिबी जगातून का नाहीशी
करत नसावा....
म्हणतातना...
देव जसा सर्वव्यापी, सर्वस्थळी व्यास करतो...तसेच गरीब आणि श्रीमंत हे सुद्धा सर्वव्यापी, सर्वस्थळी अश्या सगळ्या समाजाचा अभिन्न भाग आहेतच ना...? मग देव सर्वांचे मदतीला एकसारखा धावून का येत नसावा....?
खरेच देव असावा का ....? असेल तर मग तो गरीब आणि श्रीमंत दोघांनाही मदत करत असेल का....? की फक्त देवाचा आभास असावा....
नुसते प्रश्नच प्रश्न
पण
उत्तर काही केल्या मिळेना.....
एक दिवस "देव म्हणजे काय" सहज विचार चमकून गेला आणि "देवाचा शोध लागलाच" ..वाटल आपण रोोजची जी छोटी छोटी कामे न कळताच करत असतो...जी टाळताच येत नाहीत..
...अर्थात ती मग घरची असुदेत की,
ऑफिसला जातानाची असुदेत की,
ऑफिस मधली असुदेत....
छोटी छोटी असुदेत
किंवा
मोठ मोठी असुदेत
सकाळी उठणे...
दात साफ करणे....
प्रातः विधी करणे...
अंघोळ करून शरीर स्वछ ठेवणे....
कपडे घालणे....
धुनी भांडी करणे....
घरातला केर कचरा काढणे....
चप्पल, बूट घालणे....
जेवण बनविणे...अन्न ग्रहण करणे....
मुलांची काळजी घेणे.....
मुलांना शाळेत नेऊन सोडणे....
मुलांना शाळेतून परत आणणे....
ऑफिस मध्ये जाणे.....
ऑफिसमध्ये काम करणे.....
बँकेत जाणे...
बँकेने दिलेले पैसे घरी घेऊन येणे...
बँकेतून आणि ऑफिस मधून घरी परत येणे....
गाडी चालवणे....
गाडीला वेळेवर ब्रेक मारणे....
आईवडिलांचे उपयोगी पडणे....
समाजाचे उपयोगी पडणे....
इत्यादी...
इत्यादी.....
अशी कितीतरी हजारो कामे आपण दिवसभरात करत असतो
ही सगळी कामे
"मंदिरात"
"जाण्यापेक्षा कमी महत्वाची नसतातच" मुळी,
"एव्हाना ती मंदिरात जाण्यापेक्षाही
खूप आणि खूपच
महत्त्वाची असतात ...."
उलट ही जी कामे आपण
रोज करतो ती केली नाहीत तर
माणसाच जीवन
"नरका"
पेक्षाही वाईट होईल नाही का....?
म्हणूनच वाटत देव हा दुसरा तिसरा कुणी नसून आपण रोजच्या
रोज करीत असलेले छोटी छोटी
"कर्म"
म्हणजेच "देव" होय...
जरा विचार तर करून बघा जीवन सुखकर होण्यासाठी ही जी
छोटी छोटी कामे आपण
करतो ती सगळी
कामे मंदिरात जाण्यापेक्षाही
खूप आणि खूपच
महत्त्वाची असतात ती
आपणास
करावी लागतातच...
टाळता येणे तर शक्यच नाही
आणि
टाळतो म्हटल तर
जीवन जगणे अशक्य...
म्हणूनच
अंतिमतः म्हणाव वाटत की.....
" देवाच दुसर नाव म्हणजे कर्म "
पेरियार यांचे देवा बाबतचे विचार
एकदा ऐकण्या सारखे....
*देवाचा संदेश*
*मी मंदिरात नाही.* माझ्या अभिषेकाला दूध आणू नका, दूध द्यायचे असेल तर वस्तीतल्या एखाद्या तान्हुल्याला द्या, मी तिथेच भेटेन तुम्हाला, तुम्ही मंदिरात भेटायला येऊ नका.
*कारण मी मंदिरात नाही*
तुम्हाला मला नैवेद्य द्यायचा असेल तर जरूर द्या, पण मंदिरात नाही, एखाद्या भुकेल्याला पोट भरून खाऊ घाला, मी तिथेच असेन तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी.
*कारण मी मंदिरात नाही*
तुम्हाला माझी सेवा करायची असेल तर जरूर करा, मी आहे रस्त्यावर बसलेल्या रोग्यांमध्ये, मी तुम्हाला तिथेच भेटेन,
*कारण मी मंदिरात नाही.*
मला कुठलेही वस्त्र देऊ नका, त्या वस्त्राचा वापर एखाद्या उघड्या माझ्या मुलाला द्या, मी तिथेच भेटेन तुम्हाला, *कारण मी कुठल्याही मंदिरात नाही.*
दिव्यांचा झगमट नक्कीच करा, पण मंदिरात नाही, मी आहे अंधकारात जगत असलेल्या माझ्या अंध मुलांमध्ये त्यांच्या आयुष्याला प्रकाश द्या, मी आहे तिथे तुम्हाला दुवा द्यायला.
*कारण मी मंदिरात नाही.*
या मला भेटायला नक्की, पण पानं फुल घेऊन नको, मुक्या प्राण्यांना एक पेंडी चारा घेऊन या, तेव्हा माझे दर्शन होईल तुम्हाला.
*कारण मी मंदिरात नाही.*
मला नमस्कार करायचा असेल तर नक्की करा, मी आहे तुमच्या कुटुंबातल्या वरिष्ठांमध्ये, त्या आई वडिलांना नमस्कार करा, मी तिथेच भेटेन तुम्हाला. *कारण मी मंदिरात नसतोच... कधीही*
🙏🙏🙏🙏🙏
संदर्भ :
1.गुगल इमेज
2.वारीत आलेला अनुभव
3.ग्रामीण भागातील संस्कार
4.लहान पणा पासून बघितलेली दृशे
5.बालपणातील धार्मिक वाचन
6.हिंदू धर्माचे संस्कार
7.इतरांचे ऐकलेले विचार....
8. यु ट्यूब व्हिडीओ
9.व्हाट्स अप कलेक्शन..
9.व्हाट्स अप कलेक्शन..
Comments
Post a Comment