ज्ञान
*ज्ञानाच संकलन,संचयन आणि नियमन* ज्ञान देणारे गुगल असू दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, चॅट जिपीटी असू दे किंवा डीपसिक असू दे..ज्ञान हे कधीही पूर्ण पने मिळणार नाही...एकच माणूस सगळ्या विषयात ज्ञानी असूच शकत नाही..ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया निरंतर, अखंडित स्वरूपाची आणि निर्भेळ असायला हवी..पण तशी ती कायम राहत नाही..असे का होते..याचा विचार केल्यास असे लक्ष्यात येते..की अभ्यासाचे विषय अनेक, शिकवणारे अनेक, सगळ्या विषयाच्या ज्ञानाच एकत्रित संकलन अशक्य..आणि ज्ञानात झालेली भेसळ हा तर संशोधनाचा विषय..त्यामुळे आपल्याजवळ जे आणि जेवढे ज्ञान आहे त्यातच जीवनाचे समाधान शोधा..*ज्ञानाचा अती शोध आणि ज्ञानाचे अती संकलन हे माणसाला मानसिक रोगी बनवण्याची क्षमता ठेऊन असते.. हे माणसाला वेळीच लक्ष्यात येणे गरजेचे असते..* नाही का..!!