चोरलेले विचार
चोरलेले विचार..
चोरलेले पुस्तक..
चोरलेले ज्ञान..
चोरलेले अनुभव..
1.
जग हिंस्र असले तरीही ते सुंदर आहे असे तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा ते तुमच्या विचाराची प्रगल्भता दर्शवत असते..
2.
मानवता आणि माणुसकीची टंचाई तुमच्यात दिसून येत असेल तर ती असते तुमच्या स्नेहाची कसोटी..
3.
जग गरीब असले तरीही ते सुंदर आहे असे तुम्हाला वाटत असेल तर समजायचे तुम्ही जी पी आहात..
4.
परवानगीशिवाय आत येणे आणि मोबदल्याशिवाय उपचार घेणारे रुग्ण जास्त असतील तर समजायचे विकास अजून बाकी आहे..
5.
यश मिळो न मिळो शेवट हा चित्तथरारक झाला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर समजायचे तुमच्यातला आरोगन्स अजून बाकी आहे आणि तुमच्यातली समज ही कमी झालेली आहे..
6.
सामाजिक उतरंडीत वर वर जाण्याची वृत्ती ठेवणे ही झाली नैसर्गिक वृत्ती आणि ती प्रत्येक व्यक्तीत असलीच पाहिजे..
7.
पोषण आणि शोषण साठी हिंसेला आणि गरिबांच्या पिळवणुकीला प्राधान्य देत असाल तर समजायचे तुमची स्वतःची गरिबी अजून दूर झालेली नाही..
8.
तुमच्यासाठी आधुनिकतेचा स्पर्श जेव्हा वरवरचा ठरतो तेव्हा समजायचे तुमच्यातली पैसे कमावण्याची हाव अजून कमी झालेली नाही..
9.
नासून जाणार अपिरहार्य जग बघत असतांना नकळत तुमच्याकडून हिंसेला प्राधान्य दिल्या जात असेल तर समजायच तुम्ही अजूनही अज्ञानीच आहात..
10.
सन्मानाने जेव्हा जगता येत नाही.. स्वच्छ मार्गाने प्रगतीची आस धरता येत नाही तेव्हा आधार असतो फक्त हिंसेचा..किंवा चिवटपणे जगण्याचा.. पण याच *जगण्याच्या हिंसेवर जर का तुम्हाला मात करता आली की समजायचे तुम्ही "श्रीमंत माणूस" झालात..*
Comments
Post a Comment