जीवशास्त्राच अर्धवट ज्ञान
*जीवशास्त्र*
*जीवशास्त्रातले लेबर*
रुग्णाच्या भल्याचाच सतत विचार करत जगायच..
झिरो फेल्युअर..
झिरो एरर..
झिरो डिफेक्ट..
वर डॉक्टरांनी किती दिवस काम करत राहायच..निसर्गाने बनवलेल्या कॉम्प्लेक्स मशीन वर अर्धवट ज्ञानाच्या आधाराने स्वतःला आणि रुग्णाला किती दिवस फसवत रहायच..रुग्णाला संपूर्ण आरोग्य मिळाव या फसव्या तत्वज्ञानावर रात्रंदिवस काम करत रहायच..पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत जगायच..जीवशास्त्राला हरवण्याचे स्वप्न बघत रहायच जे कधीच शक्य होणार नाही हे माहित असून सुधा त्यावर सतत काम करत रहायच..
.
.
रुग्णाच्या दुःखात स्वतःला
किती दिवस दुःखी करायच..सुखापेक्षा दुःखावरच जास्त काम करत रहायच..
साधने आणि रुग्णाच्या गरजा वाढत असतांना होरपळणाऱ्या आनंदाला कस जपायच..रडायच तरी किती दिवस रडायच..सतत होणारा मेमरी लॉस कसा थांबवायचा..आकाराने अती मोठ्या झालेल्या जीवशास्त्रात नकल करायला सुद्धा अकल लागते हे समजून यायला सुद्धा अनेक वर्षाचा कालावधी लागतो त्यावर अनेक वर्ष काम करत रहाव लागत..तेव्हा कुठे थोड जीवशास्त्र कळू लागत..
नाही का..!!
https://youtube.com/shorts/mhjqA9I6xAE?si=kQcmrpZvcV-9koaG
Comments
Post a Comment