वैचारिक चळवळ

 वैचारिक चळवळ थांबवायची नाही..

विचारांची ताकत कायम सुरू  ठेवायची..

स्वतःला विकायच नाही..

स्वतःला जपणारा रस्ता निवडायचा..


स्वतःच स्वातंत्र्य जपायच..

कुटुंबाला स्वातंत्र्य मिळू द्यायच..


संविधाना प्रमाणे वागायच..

कुठलाही क्राईम करायचा नाही..


खोट बोलायच नाही..

सत्याची सोबत सोडायची नाही..


लबाड्या करायच्या नाही..

बेरोजगाराला भीक नाही काम द्यायच..


स्वतःच्या कुटुंबाच उत्पन्न वाढवायच..

बचत करायला शिकायच..


आरोग्य जपायच..

भविष्य सुरक्षित करायच..


वैचारिक प्रगल्भता वाढवायची..

काळानुसार स्वतःत बदल करायचा..


प्रलोभनापासून दूर राहायच..

गरजूंना जमेल तशी मदत करायची..


रोजच्या वागण्यात, रोजच्या जगण्यात प्रगल्भता येऊ द्यायची..


लोकांच जीवन सुखकर करायच..

नेहमी सत्यासोबतच राहायच..


समाधानी जीवनासाठी हे सगळ पाळायच..


आणि हो..


वैचारिक चळवळ थांबवायची नाही..

विचारांची ताकत कायम सुरू ठेवायची..

Comments

Popular posts from this blog

ज्ञान

देव दगडाचाच का...?