जगाच्या अंताची काळजी
मानवी दुःख..
विश्वातला अंधार..
विश्वातला दाट काळोख..
जगाच्या अंताची काळजी..
डेड एंड..
*उपाय एकच सतत अध्ययन*
मानवी दुःख हे बहुतेक वेळा आपोआप चालत आलेले असते किंवा मानव निर्मित तरी असते..
कोणत्याही नेत्यांमुळे किंवा व्यवस्थेतील आश्वासनामुळे ते दूर होत नसते..
*मानवासाठी जगाचा अंत ही भविष्यात घडणारी घटना नसून ती आपल्या रोजच्या जगण्याची अवस्था असते..* म्हणून या विषयावर सतत आणि भरपूर अध्ययनाची गरज आहे असे मला नेहमी वाटते..तुम्हाला या बाबत काय वाटते..मला माहित नाही..
जगाच्या अंताची आणि दुःख निवारणाची प्रक्रिया हा आपल्या *सततच्या अध्ययनाचा* विषय असायला हवा.. तीच जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया असायला हवी..ती नेहमीसाठी सुरूच राहू द्या..ती बंद पडायला नको.. अध्ययनाची प्रक्रिया बंद पडली तर समजायच ऱ्हास निश्चितच होणार.. दुःख, ऱ्हास, वेदना यावर काम करून जगात अनेक लोक श्रीमंत झालेले आहेत..आपणही असच करून श्रीमंत व्हायच की दुखितांचे अश्रू पुसून त्यांना मोठ करत करत आपणही मोठ व्हायचं..हे आधी ठरवणे गरजेच..नाही का..
या निमित्ताने हे ही समजून घ्या..
जीवनाला पूर्णविराम देणे हा देवाचा हक्क डॉक्टरांचा,मंत्र्याचा किंवा मोठ्या पोलिस ऑफिसर चा नाही..बर का..! दुःख हरण करून जीवनाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी बिसनेस मॅनेजमेंट च्या काही क्लुप्त्या चा वापर रोजच्या जीवनात केला की जीवन थोडे थोडके नव्हे बरेच सुखकर होते..ते सायंटिफिकली प्रूव्ह सुद्धा झालेले आहे..याचा आपण रोजच अनुभव घेत असतो..मानवी दुःख त्यामुळे थोडे कमी होते हे निश्चितच.. माझे ऐका बिसनेस मॅनेजमेंट च्या काही काही टिप माझ्याकडून दिल्या जातात त्याचा अंगीकार करून जीवन सुखकर बनवा.. शेवटी एकच सांगायच..
स्वतः सुखी रहा..
दुसऱ्यांना सुखी बनवा..
गरिबांना मदत करा..
गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करत रहा..
स्वतःही समृद्ध बना..
समाजाला समृद्धीसाठी मार्गदर्शन करत रहा..
ज्ञान ग्रहण करत रहा..
ज्ञान वाटत आणि शेअर करत रहा..
त्यात खंड पडायला नको..
त्यामुळे होते काय..
जगाच्या अंताची काळजी राहत नाही..
विश्वातला आणि मनातला अंधार कमी होतो..
विश्वातला दाट काळोख नाहीसा होतो..
जग कस सुंदर आणि स्वच्छ दिसू लागत..
मानवी दुःख कमी होऊ लागते..
घरात सुख नांदू लागते..
जीवनातले डेड एंड बाबतचे गैरसमज नाहीसे होतात..
जग आणि मानवी विचार कसे काम करतात हे चांगले समजू लागते..
मनातल्या मनात गुदमरल्यासारख वाटत नाही..
जीवनातली धुसरता आणि अनिश्चितता कमी होते..
एकूण काय तर मन प्रसन्न राहते..
अंधारातून सौंदर्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो..
मनातला उग्रपना कमी होतो..
मनात शांतता वास करू लागते..
मनातले दुःख झिरपुण जाते..
मनात सुख निर्माण होते..
जीवनातली हार नाहीशी होण्यास मदत होते..
जीवनाच्या नाटकात मौज निर्माण होते..
मेसेज मध्ये सौंदर्य दिसू लागते..
समाजाला प्रसन्न होण्यास तुमच्याकडून मदतच मिळते..
तुम्ही स्वतः सुखी होता..
त्यामुळे मग जग सुद्धा सुखी होत..
स्टार्ट डेकोरेटिंग युअर लाईफ..
https://youtube.com/shorts/2c8efpHiEFA?si=7tmRcWIwcWkzp-s5
Comments
Post a Comment