बुक विदाउट इंडेक्स

 *बुक विदाउट पेज नंबर आणि विदाउट इंडेक्स*


जीवनात मोठे व्हायचे असेल आणि जीवनात किंवा समाजात काही गुनात्मक बदल घडवून आणायचे असतील तर तुमच्यात चार गुण अती आवश्यक असतात..

1.डोके शांत 

2.दूरदृष्टी

3.गहन विश्लेषण

4.भरपूर वाचन

5.दारू व्यतिरिक्त आचरण


हे पाच गुण तर अती आवश्यक आणि या व्यतिरिक्त गरज म्हणजे जीवनाच इंडेक्सिंग करता यायला हवे.. ते कसे ते पुढील उदाहरणावरून समजून घेऊयात..


उदा. 

*हळू हळू वाचा.. आणि व्यवस्थित समजून घ्या..*


चला तर वाचा मग..


*"मजकूर लिहलेल्या पुस्तकाचा इंडेक्स आणि पेज नंबर फाडून घेऊन त्या पुस्तकाची पाने मागे पुढे करून कुठलीही क्रमवारी शिल्लक न ठेवता, प्रत्येक पेज मागेपुढे करून किंवा मिक्स करून तुम्हाला वाचायला दिल.. तर तुम्हाला ते पुस्तक कश्याच आहे, कोणत्या विषयाच आहे त्यापुस्तकातून काय बोध घ्यायचा हे काहीही कळणार नाही.. कारण पुस्तकाला इंडेक्सिंग नाही, पेज नंबर नाहीत, कोणत्या विषयावरच पुस्तक आहे हे काहीही कळणार नाही.."*


*"अगदी असच आहे आपल्या जीवनाच.. जीवनाला इंडेक्सिंग आहे, जीवनात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला पेज नंबर दिलेले आहेत.. आणि कोणत्या विषयावर काम करणार आहोत हे एकदा निश्चित केल की जीवनाच पुस्तक चांगल्या पद्धतिने लिहल्या जाते.."*


*"इंडेक्सिंग नसलेल, पेज नंबर नसलेल आणि प्रत्येक पेज क्रमवारी नुसार जोडलेले नसेल तर त्या पुस्तकाला आणि जीवनाला काहीही अर्थ राहात नाही.. म्हणून एकच सांगण जीवनाच्या प्रत्येक पेजला पेज  नंबर द्यायला शिका आणि पुस्तकाला असतो तसा जीवनाचा इंडेक्स करायला घ्या.. तेव्हा कुठे तुमच्या जीवनाला पुस्तका प्रमाणे अर्थ मिळतो.. अन्यथा.. ते जीवन पेज नंबर आणि इंडेक्स नसलेल्या पुस्तकासारख विस्कळीत राहते त्यातून स्वतःला किंवा समाजाला कुठलाही अर्थ काढता येत नाही.."*


त्यामुळे करीत असलेल्या व्यवसायात आणि जीवनात मोठे व्हायचे असेल तर *"आधी जीवनाचा इंडेक्स बनवा मग प्रत्येक पेजला पेज नंबर द्या.."* तेव्हा त्या पुस्तकातुन अर्थ निघतो.. अन्यथा जीवन हे पेज नंबर आणि इंडेक्स नसलेल्या पुस्तकासारख असत.. ज्यातून काहीच अर्थबोध होत नाही..स्वतःलाही काही कळत नाही.. समाजाला तर त्यातले काहीच कळत नाही.. जीवन हे अर्थबोध नसलेल्या पुस्तकासारख होऊन जाते.. नाही का..!!

Comments

Popular posts from this blog

देव दगडाचाच का...?

ज्ञान