इनईकव्यालिटी

 *वर्ल्ड इनईकव्यालिटी*


आमच्या सोबत बरोबरी करायची का..करून बघ..?


कर प्रयत्न करून बघ..तुला ते जमायच नाही.. तु श्रीमंत होशील का याबाबत मला शंका आहे ..


कारण..


तुला लबाडी करता येत नाही..


तुझा देवावर गाढ विश्वास..


तुला सरकार कडून पैसे कसे काढायचे ते कळत नाही..


मोठ्या बिझिनेस मधल्या लांड्या लबाड्या कळत नाही..


आहे त्या बिझिनेस मध्ये लोकांकडून जास्त पैसे काढता येत नाही..


तुझ्याकडे शिक्षण आहे पण बिझिनेस कसा करायचा असतो याचे योग्य ज्ञान नाही..


अरे तू पूर्णतः अज्ञानी आहेस हे का कबूल करत नाही..


तुझा जन्म हा गरीब घरात झालेला आहे..तू CA कडे कधी जात नाही.. त्यामुळे तुला बॅलन्स सीट आणि टॅक्स कसा वाचवायचा असतो याचे ज्ञानच असूच शकत नाही..तुझी बॅलन्स सिटच आकाराने बारीक.. तुझी त्यात चूक नाही..हे तू समजून घे..


तुझा जन्म फक्त कष्ट करून कुटुंबाच पोट भरण्यासाठी झालेला आहे..त्यावरच खरे तर तू लक्ष द्यायला हवे..हे तुला कळत कस नाही..


तू राहतो जमिनीवरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर जिथे फास्ट स्पीड वाली लिफ्टच नसते..तुझ्या घरात इलेक्ट्रिक वर चालणारा जिना पण नाही..तरी परंतु तू शंभराव्या माळ्यावर जाऊन राहायचे स्वप्न बघतोस.. असा कसा वागतो रे तू..तुला असे स्वप्न तरी कसे पडतात..फास्ट स्पीड असलेल्या लिफ्टने घरात जाऊन 100 रा व्या माळ्यावरून जग किती सुंदर दिसते ते पाहण्याचे..


बघ प्रयत्न करून बघ..जगातल्या सोडून दे भारतातल्या 99% गरीब लोकांमधून निघून 1% श्रीमंत लोकांमध्ये कसे पोहचायचे ते बघ..


प्रामाणिकपणे प्रयत्न आणि भरपूर कष्ट करून बघ आज नाही उद्या तुझी गणना कदाचित 1% प्रॉसपर किंवा ईलिटस लोकांमध्ये होईल..आशेवरच तर जग चालत असते हे कधीच विसरू नको..


तू भावना प्रधान आहेस कदाचित तुला यश मिळेलही..



https://youtu.be/mgLw3s84-tU?si=-PQ-xWNp_gtWTtBc



https://youtu.be/GcVBM-6DQrg?si=FUeKpoMu4qFt546B



https://youtu.be/Jpk0sz3ouXs?si=DG1bSHEyfDgqlih1

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..