Popular posts from this blog
ज्ञान
*ज्ञानाच संकलन,संचयन आणि नियमन* ज्ञान देणारे गुगल असू दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, चॅट जिपीटी असू दे किंवा डीपसिक असू दे..ज्ञान हे कधीही पूर्ण पने मिळणार नाही...एकच माणूस सगळ्या विषयात ज्ञानी असूच शकत नाही..ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया निरंतर, अखंडित स्वरूपाची आणि निर्भेळ असायला हवी..पण तशी ती कायम राहत नाही..असे का होते..याचा विचार केल्यास असे लक्ष्यात येते..की अभ्यासाचे विषय अनेक, शिकवणारे अनेक, सगळ्या विषयाच्या ज्ञानाच एकत्रित संकलन अशक्य..आणि ज्ञानात झालेली भेसळ हा तर संशोधनाचा विषय..त्यामुळे आपल्याजवळ जे आणि जेवढे ज्ञान आहे त्यातच जीवनाचे समाधान शोधा..*ज्ञानाचा अती शोध आणि ज्ञानाचे अती संकलन हे माणसाला मानसिक रोगी बनवण्याची क्षमता ठेऊन असते.. हे माणसाला वेळीच लक्ष्यात येणे गरजेचे असते..* नाही का..!!
जीवशास्त्राच अर्धवट ज्ञान
*जीवशास्त्र* *जीवशास्त्रातले लेबर* रुग्णाच्या भल्याचाच सतत विचार करत जगायच.. झिरो फेल्युअर.. झिरो एरर.. झिरो डिफेक्ट.. वर डॉक्टरांनी किती दिवस काम करत राहायच..निसर्गाने बनवलेल्या कॉम्प्लेक्स मशीन वर अर्धवट ज्ञानाच्या आधाराने स्वतःला आणि रुग्णाला किती दिवस फसवत रहायच..रुग्णाला संपूर्ण आरोग्य मिळाव या फसव्या तत्वज्ञानावर रात्रंदिवस काम करत रहायच..पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत जगायच..जीवशास्त्राला हरवण्याचे स्वप्न बघत रहायच जे कधीच शक्य होणार नाही हे माहित असून सुधा त्यावर सतत काम करत रहायच.. . . रुग्णाच्या दुःखात स्वतःला किती दिवस दुःखी करायच..सुखापेक्षा दुःखावरच जास्त काम करत रहायच.. साधने आणि रुग्णाच्या गरजा वाढत असतांना होरपळणाऱ्या आनंदाला कस जपायच..रडायच तरी किती दिवस रडायच..सतत होणारा मेमरी लॉस कसा थांबवायचा..आकाराने अती मोठ्या झालेल्या जीवशास्त्रात नकल करायला सुद्धा अकल लागते हे समजून यायला सुद्धा अनेक वर्षाचा कालावधी लागतो त्यावर अनेक वर्ष काम करत रहाव लागत..तेव्हा कुठे थोड जीवशास्त्र कळू लागत.. नाही का..!! https://youtube.com/shorts/mhjqA9I6xAE?si=kQcmrpZvcV-9ko...
Comments
Post a Comment