Posts

Showing posts from December, 2025

भाकरी चोर

 आमच अन्न कुणी पळवल..? आमचा डाळ भात कुणी खाल्ला..? आमची बेसन भाकर कुणी पळवली..? याला कोण जबाबदार..? सरकार,आमच नशीब की, भ्रष्टाचारी..? आम्हाला जेवण नाही..? चांगले घर नाही..? चांगले उपचार नाहीत..? चांगले कपडे नाहीत..? सगळी कडे महागाई..? कुठ काम मिळणा.. आमच काय चुकल..? काहीच काळना..? आम्ही कुणाच काय घोड मारलय..? आमची चुकी तरी काय..? आर कुणी तरी सांगा कीर आमच चुकल तरी काय..? https://youtube.com/shorts/pu4gU3iLJe4?si=sd2VbL-5qbZ7Wxzr

वैचारिक चळवळ

 वैचारिक चळवळ थांबवायची नाही.. विचारांची ताकत कायम सुरू  ठेवायची.. स्वतःला विकायच नाही.. स्वतःला जपणारा रस्ता निवडायचा.. स्वतःच स्वातंत्र्य जपायच.. कुटुंबाला स्वातंत्र्य मिळू द्यायच.. संविधाना प्रमाणे वागायच.. कुठलाही क्राईम करायचा नाही.. खोट बोलायच नाही.. सत्याची सोबत सोडायची नाही.. लबाड्या करायच्या नाही.. बेरोजगाराला भीक नाही काम द्यायच.. स्वतःच्या कुटुंबाच उत्पन्न वाढवायच.. बचत करायला शिकायच.. आरोग्य जपायच.. भविष्य सुरक्षित करायच.. वैचारिक प्रगल्भता वाढवायची.. काळानुसार स्वतःत बदल करायचा.. प्रलोभनापासून दूर राहायच.. गरजूंना जमेल तशी मदत करायची.. रोजच्या वागण्यात, रोजच्या जगण्यात प्रगल्भता येऊ द्यायची.. लोकांच जीवन सुखकर करायच.. नेहमी सत्यासोबतच राहायच.. समाधानी जीवनासाठी हे सगळ पाळायच.. आणि हो.. वैचारिक चळवळ थांबवायची नाही.. विचारांची ताकत कायम सुरू ठेवायची..