Posts

Showing posts from June, 2024

लाईफ मॅनेजेंटम

 जीवनात त्रस्त आहात.. जीवनात हवे तसे काही घडत नाही..उत्पन्न कमी त्यामुळे मन प्रसन्न राहत नाही.. कुटुंबाच्या वाढत्या गरजा पूर्ण करतांना मानसिक त्रास होतोय..बिझिनेस मध्ये हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही.. पगार कमी गरजा जास्त.. अशी परिस्थिती झालीय का.. चार चाकाची गाडी घ्यावीशी वाटते..यू ट्यूब मध्ये दिसते तसे सुंदर इंटेरियर केलेले घर घ्यावेसे वाटते..परंतु कमी उत्पन्ना मुळे ते घेणे शक्य वाटत नाही..साधारण उत्पन्नामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाही..*अशी द्विधा परिस्थिती तुमच्या मनाची झाली असेल तर आत्महत्या करणे हा त्यावरचा मार्ग असू शकत नाही..* आत्महत्या करणे ऐवजी तुम्ही उत्पन्न कसे वाढेल यावर भर द्यावा.. *वेळेचे आणि आर्थिक परिस्थितीचे मॅनेजेंट करायला शिका..* ती आजच्या काळातील आवश्यक गरज झालेली आहे..*कमी उत्पन्नातही चांगले जीवन कसे जगता येईल यावर भर द्या..* एखादी हॉबी डेव्हलप करून त्यात स्वतःला बिझी ठेवायला शिका..लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेच पाहिजे असे नसते..*स्वतः पुढेच अनेक प्रश्न उपस्थित असताना समाजातील इतर प्रश्नावर उपाय शोधणे म्हणजे मानसिक आजाराच निमंत्र...

ऍडजस्टमेंट डिसऑर्डर , डिप्रेशन ते डीजनरेशन

 माणूस अती पसाऱ्यामुळे घरात, अती कामामुळे ऑफिसात किंवा सतत च्या प्रवासामुळे जेव्हा विचार करून थकतो आणि जीवनातल्या अनेक अडचणींचा सामना करतांना विचार करून त्याला जीवशासस्त्रातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.. अश्यावेळी मग माणूस विचार करून करून फार थकुन जातो.. तरीही परंतु त्याला जीवनातल्या अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे  मिळत नाहीत तेव्हा मग तो मनुष्य पूर्णतः मनाने, विचाराने, शरीराने आणि मेंदूने थकतो..अश्यावेळी सर्वप्रथम तो ऍडजस्टमेंट डिसऑर्डर ने ग्रस्थ होतो..त्यानंतर त्याला ब्लड प्रेशर चा आजार होतो..त्याच रुग्णाला मग डायबेटिस सारखा बरा न होणारा आजार पण होतो..या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एन्झायटी न्यूरोसिस या आजाराची लक्षणे माणसास सर्वप्रथम दिसू लागतात..अश्या अनेक शारीरिक आणि मानसिक कारणामुळे माणसाच्या मेंदूला मग आपल्याच शरीरातले हार्मोन व्यवस्थित नियंत्रित करता येत नाहीत..या सगळ्याचा शरीरावरील परिणाम म्हणजे माणूस डिप्रेशन मध्ये जातो.. डिप्रेशन ची लक्षणे उग्र आहेत, मध्यम स्वरूपाची आहेत की तीव्र स्वरूपाची आहेत हे उपचार देणाऱ्या मानसोपचारातल्या तज्ञ डॉक्टर लाच कळू शकते..की...