बुक विदाउट इंडेक्स
*बुक विदाउट पेज नंबर आणि विदाउट इंडेक्स* जीवनात मोठे व्हायचे असेल आणि जीवनात किंवा समाजात काही गुनात्मक बदल घडवून आणायचे असतील तर तुमच्यात चार गुण अती आवश्यक असतात.. 1.डोके शांत 2.दूरदृष्टी 3.गहन विश्लेषण 4.भरपूर वाचन 5.दारू व्यतिरिक्त आचरण हे पाच गुण तर अती आवश्यक आणि या व्यतिरिक्त गरज म्हणजे जीवनाच इंडेक्सिंग करता यायला हवे.. ते कसे ते पुढील उदाहरणावरून समजून घेऊयात.. उदा. *हळू हळू वाचा.. आणि व्यवस्थित समजून घ्या..* चला तर वाचा मग.. *"मजकूर लिहलेल्या पुस्तकाचा इंडेक्स आणि पेज नंबर फाडून घेऊन त्या पुस्तकाची पाने मागे पुढे करून कुठलीही क्रमवारी शिल्लक न ठेवता, प्रत्येक पेज मागेपुढे करून किंवा मिक्स करून तुम्हाला वाचायला दिल.. तर तुम्हाला ते पुस्तक कश्याच आहे, कोणत्या विषयाच आहे त्यापुस्तकातून काय बोध घ्यायचा हे काहीही कळणार नाही.. कारण पुस्तकाला इंडेक्सिंग नाही, पेज नंबर नाहीत, कोणत्या विषयावरच पुस्तक आहे हे काहीही कळणार नाही.."* *"अगदी असच आहे आपल्या जीवनाच.. जीवनाला इंडेक्सिंग आहे, जीवनात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला पेज नंबर दिलेले आहेत.. आणि कोणत्या विषयावर काम करणार...