Posts

Showing posts from January, 2025

ज्ञान

 *ज्ञानाच संकलन,संचयन आणि नियमन* ज्ञान देणारे गुगल असू दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, चॅट जिपीटी असू दे किंवा डीपसिक असू दे..ज्ञान हे कधीही पूर्ण पने मिळणार नाही...एकच माणूस सगळ्या विषयात ज्ञानी असूच शकत नाही..ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया निरंतर, अखंडित स्वरूपाची आणि निर्भेळ असायला हवी..पण तशी ती कायम राहत नाही..असे का होते..याचा विचार केल्यास असे लक्ष्यात येते..की अभ्यासाचे विषय अनेक,  शिकवणारे अनेक, सगळ्या विषयाच्या ज्ञानाच एकत्रित संकलन अशक्य..आणि ज्ञानात झालेली भेसळ हा तर संशोधनाचा विषय..त्यामुळे आपल्याजवळ जे आणि जेवढे ज्ञान आहे त्यातच जीवनाचे समाधान शोधा..*ज्ञानाचा अती शोध आणि ज्ञानाचे अती संकलन हे माणसाला मानसिक रोगी बनवण्याची क्षमता ठेऊन असते.. हे माणसाला वेळीच लक्ष्यात येणे गरजेचे असते..* नाही का..!!

विचारांचा भोवरा

 *विचारांचा भोवरा फिरला कसा गरागरा* 2005 ते 2025 या काळात तंत्रज्ञानामुळे झालेला बदल अचंभित करणारा होता..माणसाच्या मनावर ताबा घेतलेला हाच तो काळ.. सहज आणि सतत मिळणारे अगणित ज्ञान, सततचे दृष्यप्रदुषण, वेळेचा अपव्यय, सारासार विचार करण्याची हरवत गेलेली क्षमता, दुसऱ्यांच्या विचारा पुढे स्वतःतल्या विचारातली कमतरता, वाढत गेलेला विसरभोळेपणा, अती आत्मकेंद्रित वृत्ती हे सगळे आपल्यात कधी शिरले कळलेच नाही..कारण तंत्रज्ञानाचा स्पिडच एवढा जबरदस्त होता की विचार करून तंत्रज्ञान समजून घेण्यातच 15 ते 20 वर्ष कधी गेलीत हे आपल्या मनाला कळलेच नाही.. त्यातल्या त्यात जिवशास्त्रातले बदल तर डॉक्टरांसाठी आणि त्यांच्या रुग्णासाठी अती अचंभित करणारेच होते..डॉक्टर त्यांच्याजवळच्या तोकड्या ज्ञानाच्या आधाराने कसे निरुपयोगी उपचार करायचे हे सगळ्या जगाला कळल ते याच काळात..नाही का..!!